Posts

Showing posts from 2017

Harry Potter Theories..

Image
हॅरी पॉटरच्या ज्यांनी फक्त फिल्म्स पहिल्यात, ते लोक कितीतरी गोष्टींना मुकलेत. आणि ज्यांनी बुक्स वाचलीत पण फॅन थियरीज नाहीत वाचल्या ते लोकसुद्धा कितीतरी गोष्टींना मुकलेत.. अशीच एक फॅन थियरी आहे.. की ड्रेको मॅल्फॉयला हर्मायनी ग्रेंजर आवडायची. मनातल्या मनात. असंख्य फॅन्स नी ही थियरी मान्य केली आहे. दुसऱ्या भागात जेव्हा रहस्यमयी तळघरातून कालदृष्टी साप बाहेर आलेला असतो, तेव्हा त्याबद्दलची माहिती हॅरी आणि रॉनला, हर्मायनी च्या हातात असलेल्या एका कागदामुळे कळते. त्यावेळी हर्मायनी निर्जीव झालेली असल्यामुळे तो कागद कुठून आला याबद्दल माहिती मिळत नाही. हॅरी तर्क करतो की तिने तो कागद लायब्ररी मधल्या एखाद्या पुस्तकातून काढला असेल. बुकमध्ये पण असाच उल्लेख आहे. पण एका फॅन थियरी नुसार, तो कागद तिला ड्रेकोने दिलेला असतो. लॉजिकली पाहायला गेलं तर "हर्मायनी" पुस्तकाचं पान फाडेल हे आजिबात पटत नाही. तिचं कॅरॅक्टर ज्याप्रमाणे दाखवलं आहे, त्यानुसार तर ती पोरगी पुस्तकांची पानं दुमडून देखील ठेवत नसेल.. मग फाडायचं लांबच राहिलं.. ह्या थियरी चा बेस म्हणून अजून एक घटना आहे. फिल...

The Haunted House.

"तू आधी शांत हो.. इथे बस जरा. मी ग्लास भरतो.." विक्रम सुमेधला म्हणाला. सुमेध त्याच्याकडे आला तेव्हाच अत्यंत घाबरलेला होता, त्याचं पुर्ण शरीर घामाने निथळत होतं. त्याला धड बोलताही येत नव्हतं. विक्रमने आधी त्याला आत घेतलं आणि शांत केलं. तीन महिने झाले असतील सुमेधला इथे येऊन. बदली होऊन इथे आला तेव्हा इथे त्याला कोणी ओळखत नव्हतं. पण तो अजून एकटाच असल्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यात त्याला काहीच अडचण नव्हती. तसा तो दोन महिने हॉटेल मध्ये राहिलासुद्धा. ऑफिस मध्ये त्याची ओळख विक्रमशी झाली. दोघांच्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्यामुळे त्यांच्यात लवकरच मैत्री झाली. विक्रमनेच सुमेधला रहायला घर शोधण्यास मदत केली. त्याच्या ओळखीच्या ब्रोकर थ्रू सुमेधला एक चांगला मोठा बंगला अगदी स्वस्तात भाड्याने मिळाला होता. इतका मोठा बंगला अगदी स्वस्तात मिळाल्यामुळे सुमेध एकदम खुश होता. आतलं फर्निचर वगैरे जुन्या काळातलं असलं तरी एकदम चांगल्या परिस्थितीत होतं. त्या ब्रोकरने किंवा ज्याने कुणी त्या बंगल्याच्या मेन्टेनन्सचं काम केलतं त्याने ते अगदी चोख केलं होतं. एकच गोष्ट सुमेधला खटकली, ती म्हणजे बंगल्याचा र...

"Vru the Wondergirl.." & the Mystery of Thor...

एकदा वृ असंच फिरत फिरत लंडनला जाती. तिथं सतत कामासाठी वसवसलेला शेरलाॅक होल्मसपन केस शोधत फिरत असतो. सोबतीला इमा वाॅटसनपन असती. (डाॅ. वाॅटसन सुट्टीवर असल्यामुळं शेरलाॅकन...

"ञ-मॅन"

Image
"ञ" आणि "त्र".. लहानपनापासूनच जुळे भाऊ. ञ पहिल्यापासूनच बराचसा वाळीत टाकल्यासारखा.. त्र चा मात्र सगळीकडेच लाड होत.. यत्र तत्र सर्वत्र फक्त "त्र"च. ञ ची आठवण मात्र अगदी फारच गरज पड...

दात घासण्याचे प्रकार..

लोकं आजकाल गरज म्हनून नाय, तर फाॅर्म्यालिटी म्हनून दात घासत्यात.. दात घासना-यांचेपण प्रकार असत्यात.. सगळ्यात बेसिक म्हंजे, काय काय लोकं दात घासत्यात, तर काय काय "ब्रश" करत्य...

Breakup..

अरेंज मॅरेजची पहिली स्टेप म्हणजे पोरीचा ब्रेकअप. तिला समजावून, हानून-मारून किंवा ईमोशनल ब्लॅकमेल करून, म्हंजे बाय हूक आॅर क्रूक पोरीला आपल्या बाॅयफ्रेंडला सोडायला लाव...

समाज चूत्या असतुय.

समाजासाठी कधी काय करायचं नाय.. समाज चूत्या असतुय. तुम्ही आत्ता समाजाच्या भल्यासाठी कायतरी करता, समाज १००-२०० वर्षानी तुमच्या नावानी भांडत बसतुय. तुमच्या बाजूनी बोलनारे...