Harry Potter Theories..

हॅरी पॉटरच्या ज्यांनी फक्त फिल्म्स पहिल्यात, ते लोक कितीतरी गोष्टींना मुकलेत. आणि ज्यांनी बुक्स वाचलीत पण फॅन थियरीज नाहीत वाचल्या ते लोकसुद्धा कितीतरी गोष्टींना मुकलेत..

अशीच एक फॅन थियरी आहे.. की ड्रेको मॅल्फॉयला हर्मायनी ग्रेंजर आवडायची. मनातल्या मनात. असंख्य फॅन्स नी ही थियरी मान्य केली आहे.

दुसऱ्या भागात जेव्हा रहस्यमयी तळघरातून कालदृष्टी साप बाहेर आलेला असतो, तेव्हा त्याबद्दलची माहिती हॅरी आणि रॉनला, हर्मायनी च्या हातात असलेल्या एका कागदामुळे कळते. त्यावेळी हर्मायनी निर्जीव झालेली असल्यामुळे तो कागद कुठून आला याबद्दल माहिती मिळत नाही. हॅरी तर्क करतो की तिने तो कागद लायब्ररी मधल्या एखाद्या पुस्तकातून काढला असेल. बुकमध्ये पण असाच उल्लेख आहे.




पण एका फॅन थियरी नुसार, तो कागद तिला ड्रेकोने दिलेला असतो. लॉजिकली पाहायला गेलं तर "हर्मायनी" पुस्तकाचं पान फाडेल हे आजिबात पटत नाही. तिचं कॅरॅक्टर ज्याप्रमाणे दाखवलं आहे, त्यानुसार तर ती पोरगी पुस्तकांची पानं दुमडून देखील ठेवत नसेल.. मग फाडायचं लांबच राहिलं..


ह्या थियरी चा बेस म्हणून अजून एक घटना आहे. फिल्म मध्ये जेव्हा हॅरी, रॉन च्या फॅमिली सोबत पुस्तकं विकत घेत असतो; तेव्हा पुस्तकांच्या दुकानात ड्रेको आणि त्याचे वडीलदेखील असतात. त्यावेळी जिन्यावर उभा असताना ड्रेकोच्या हातात एक पुस्तक असतं. आणि खाली येताना तो त्यातलं एक पान फाडून खिशात ठेवतो.



त्याच सीनमध्ये नंतर ड्रेकोचे वडील जिनी च्या पुस्तकांमध्ये टाॅम रिडलची डायरी ठेवतात. त्याचं पुढे काय होतं हे सगळ्यांनाच माहितीये. मात्र ड्रेकोने फाडलेल्या पानात काय होतं किंवा नंतर त्यांचं काय झालं ह्याचा काहीही उल्लेख कुठेच नाही. मात्र फॅन थियरी नुसार हा तोच कागद होता जो त्याने नंतर हर्मायनी ला दिला.

आता ते त्याने तिच्यावरच्या प्रेमापोटी केलं, की गिल्टी फील झाल्यामुळे केलं हे त्यालाच माहीत.. 😂
#हॅष्टॅग.

Comments

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

ओंडका आणि अजगर...

"ञ-मॅन"