समाज चूत्या असतुय.

समाजासाठी कधी काय करायचं नाय.. समाज चूत्या असतुय.
तुम्ही आत्ता समाजाच्या भल्यासाठी कायतरी करता, समाज १००-२०० वर्षानी तुमच्या नावानी भांडत बसतुय. तुमच्या बाजूनी बोलनारेबी बावळाट असत्यात, अन् इरोधात बोलनारेबी. बेसिकली सगळीच बावळाट असत्यात.

येवडं सगळं कळूनबी समाजासाठी काय करायचंच असंल, तर पैला समाज सोडायचा. समाज येक नसतुय, लै असत्यात. तुम्ही मग भले सगळ्या समाजांच्या लोकांसाठी चांगलं कायतरी करायला जा.. १०० वर्षांनी तुमच्या समाजाची लोकं तुमच्यावर काॅपीराईट मारत्यात. तुमचा पुतळा उभा करत्यात. दुस-या समाजाची मानसं म्हंत्यात ह्यांनी आमच्यासाठी काय नाय केलं. आमच्या समाजातल्या मानसानी आमच्यासाठी केलंय, मग आम्ही त्याचा पुतळा उभा करनार. मग भांडनं लागत्यात. "'आमच्या' मानसानं 'तुमच्या'साठीबी काम केलतं.." असं म्हनून दोन्ही समाजातली लोकं भांडत बसत्यात.

म्हनूनच आपलं आपन नीट राहायचं. उगाच समाजासाठी काय करत बसायचं नाय.. न्हायतर मंग हैत आपल्या नावानं भांडनं आपन मेल्यावर..

#हॅष्टॅग.

Comments

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

ओंडका आणि अजगर...

"ञ-मॅन"