दात घासण्याचे प्रकार..

लोकं आजकाल गरज म्हनून नाय, तर फाॅर्म्यालिटी म्हनून दात घासत्यात..

दात घासना-यांचेपण प्रकार असत्यात..
सगळ्यात बेसिक म्हंजे, काय काय लोकं दात घासत्यात, तर काय काय "ब्रश" करत्यात.
दात घासण्यात राख, मीठ, डाबर लाल, इठोबा, किंवा मग कुटलंबी दंतमंजन चालतं.. (मिसरी त्यात घ्यायची का नाय ह्यावर ईचार चालूये, कारन लोकं टैमपास म्हनूनपन मिसरी घासत्यात). ब्रश करायला पेश्ट सोडून दुसरं काय नाय चालत.

दात घासत असल्यावर येकाच ठिकानी हुभं रहावं लागतं. ब्रश करत असल्यावर तोंडात ब्रश ठिवून आक्ख्या घरात हिंडता येतं. (म्हंजे काय काय लोकांनाच हे जमतं. मला तसं नाय जमत, दाताला पेश्ट लागल्या लागल्या ती थुकायची माजी घाई अस्ते. त्यामुळं तोंडात ब्रश ठिवूनपन गप्पा मारता येनारे लोकं मला लई टॅलेंटेड वाटत्यात).

दुकानदाराला "कोलगेट" मागून, त्यानं दिलेली "क्लोजप" कोलगेटच हाय असं समजून वापरनारी लोकंबी असत्यात. कोलगेटनं नावच तेवडं कमावलंय.. पन आता काँपिटिशन मध्ये टिकायचं म्हनून कायबी करायलेत.. लोकं मिठानं दात घासत्यात म्हनून ह्यांनी पेश्टीत मिठ टाकलं, राखंनंपन घासत्यात कळल्यावं "चारकोल" टाकून पेश्ट काळी केली..(मिसरीचं त्यांना कुनी सांगितलं नाय का?) त्यांना दात घासनारं पब्लिक ब्रशकडं वळवायचंय.. म्हनून म्होट्या पेश्टवर ब्रशबी कदीकदी फ्री देत्यात.

पन झैरती लै भंगार करत्यात.. कोनबी कुटुनबी येतं आन् ईचारतं, "तुमच्या पेश्टमदे मीठ हाय का?, कडुलिंब हाय का?, कोळसा हाय का?" कुटनंबी भायेर येत्यात.. फ्रीज, गाडीचं इंजिन एटसेट्रा. करीना, प्रियंका ठीक हुतं.. पन काजल अग्रवाल ( किंवा 'अगरवाल') ला त्यात बगून लै वाईट वाटलं.. भारी दिसती तशी त्यातबी.. पिच्चरमदे जवा ती कुनाकडं रागानं डोळं बारीक करुन बगती ना.. तवा लई क्युट वाटती.. तशा सगळ्याच सौथइंडियन हिराॅईनी क्युट दिसत्यात (थमन्ना भाट्या सोडून).
'क्युट'चं प्रोनौंसेशन 'क्विट' करत न्हायत हे मला म्हायतेय.. तसंच ईशय भरकटला की "क्विट" करावा हेपन मला म्हायतेय.. तवा आता क्विट करतु..

Comments

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

Harry Potter Fan Theories

ओंडका आणि अजगर...