Harry Potter Fan Theories

हॅरी पॉटर चा फक्त पहिला भागही ज्याने पाहिलाय, तोसुद्धा सांगू शकेल कि डर्स्ली परिवार हॅरीचा किती प्रमाणात तिरस्कार करायचं. पुस्तकात किंवा मूव्हीमध्ये त्याचं कारण असं सांगितलंय कि पेटूनिया तिच्या बहिणीवर म्हणजेच लिली पॉटर वर जळायची. आणि तसंही हॅरी त्यांच्या घरी आश्रितच होता. त्यामुळे त्याचा त्यांना वैताग येऊन त्यातून ते त्याचा तिरस्कार करू लागणं साहजिक होतं.



मात्र एका फॅन थिअरी नुसार, फक्त पेटूनिया आणि लिली च्या संबंधांमुळे, किंवा हॅरी त्यांना जड(!) वाटत होता म्हणून ते त्याचा तिरस्कार करत होते असं नाही. तर त्याला अजून एक गोष्ट कारणीभूत होती. ती म्हणजे वोल्डेमोर्ट!

वोल्डेमोर्ट कडून चुकून तयार झालेला होर्क्रक्स म्हणजे हॅरी. वोल्डेमोर्टच्या हॅरीच्या शरीरात राहिलेल्या आत्म्याच्या तुकड्यामुळेच डर्स्ली परिवार हॅरी चा जास्त तिरस्कार करायचं. (आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्यात सगळे येडछाप वाटायचे.)



ह्या थिअरीला आधार म्हणून डेथली हॅलोज मधल्या लॉकेट कडे पाहता येईल. ते लॉकेट ज्याच्या गळ्यात घातलेलं असायचं त्यावर ते परिणाम करायचं. आणि त्याच्या आसपासच्या लोकांवरही. त्याला कारण होतं त्या लॉकेट मध्ये असणारा वोल्डेमोर्ट च्या आत्म्याचा तुकडा.
त्या लॉकेट सोबत थोडेच दिवस राहून देखील हॅरी, रॉन, आणि हर्मायनी एकमेकांशी भांडायला लागलेले असतात.



मग कल्पना करा, डर्स्ली परिवाराने एका जिवंत होर्क्रक्ससोबत तब्बल ११ वर्षं काढली होती. त्यांचे तर काय हाल झाले असतील.
ही थिअरी वाचून डर्स्ली परिवाराबद्दल दया यायला लागते..



हॅरीच्या शरीरात असलेल्या होर्क्रक्सबद्दल आणखी एक फॅन थिअरी आहे

या थिअरीनुसार; सर्वाहारकांचं (Dementors) हॅरीच्या प्रती असलेलं आकर्षण हे या होर्क्रक्स मुळेच असतंय. हॅरी जेव्हा प्रो. ल्युपिन ना विचारतो, कि सर्वहारक त्याच्याकडेच जास्त आकर्षित का होतात; तेव्हा ते त्याला त्याच्या भूतकाळाचं कारण सांगतात.




 मात्र या थिअरीनुसार, हॅरी च्या शरीरातील दोन आत्मे या आकर्षणाला कारणीभूत आहेत असं सांगितलंय.

#हॅष्टॅग.

Comments

Popular posts from this blog

"ञ-मॅन"

"Vru the Wondergirl.." & the Mystery of Thor...