Smartphone..

आधी मोबाईल आलं.. घरात एखाद्याकडं मोबैल असायचं, त्यावरनं सगळी फोन करायची.. मग त्या मोबैल मध्ये गेम आलं.. घरातली बारीकी पोरंच त्ये गेम खेळायची.. येकच फोन हाय म्हनून भावंडं बारी बारीनं गेम खेळायची, त्यात लैदा भांडनंबी व्हायची..
मग त्या मोबैलमधनं गानीबी एेकता यू लागली.. येखादा मोठ्यानं गानी लावायचा, अन् सगळी अैकायची. घरातल्या सगळ्यांच्या आवडीची गानी जबरदस्ती बाकीच्यांना ऐकायला लागायची.
मग त्या मोबैलमधनं फोटूबी काढता यू लागलं.. लोकं दुसऱ्याचा फोटू काढायची, अन् दुसऱ्याला आपला फोटू काढायला लावायची..

आता स्मार्टफोन हायत..
घरात सगळ्यांकडं येकेक.
बारक्या पोरापास्न एक पाय मसनात गेलेली मानसंबी त्यावरच्या गेम खेळत्यात.. आपापल्या स्मार्टफोनवर. आता आजाबात भांडनं नैत होत.
गानी अैकायला आता हेडफोन हायत.. सगळी आपल्याला आवडतंय त्येच गानं अैकत्यात.. येकटं येकटं. आपल्यामुळं कुनाला डिश्टर्ब नकू, कि कुनामुळं आपल्याला..
स्मार्टफोननं आपला आपल्याला फोटू काढता येतुय.. कुनाला रिक्वेश्ट करायला नाय लागत.. आमचा फोटू काडा म्हनून..

आता स्मार्टफोनवर आपला आपल्याला पिच्चरबी बगता येतूय.. कुनाचा डिश्टर्ब नाय ना काय नाय..
मज्जाय ब्वा स्मार्टफोन म्हंजे..

Comments

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

Harry Potter Fan Theories

ओंडका आणि अजगर...