ओंडका आणि अजगर...

लहानपनी मम्मी लय गोष्टी सांगायची, त्यातली एक गोष्ट..

एका तळ्यात एक बेडकांचं गाव असतं. तिथले सगळे बेडूक आरामात रहात असतात. त्यांच्यातला एक बेडूक बाहेर जंगल फिरून येतो, आणि सगळ्यांना सांगतो कि जंगलाला "राजा" असतोय. मग ह्या बेडकांना वाटायला लागतं, कि आपल्या तळ्यालापण आपला एक राजा हवा. मग ते सगळे देवाकडं मागणी करतात, कि आम्हाला एक राजा हवाय. देव कामात असतोय, त्यामुळं तो "ठीकाय" म्हणून एक लाकडाचा ओंडका त्या तळ्यात टाकतो, आणि बेडकांना सांगतो कि हाच तुमचा राजा. सगळे बेडूक जाम खुश होतात.

असेच काही दिवस जातात, बेडकांना हळूहळू लक्षात यायला लागतं, कि आपला हा राजा काहीच करत नाही, नुसता पाण्यावर तरंगत असतोय. आणि काही दिवसांनी तर बेडकांना त्या ओंडक्याचं काहीच अप्रूप वाटेनासं होतं, काही उत्साही बेडूक तर त्या ओंडक्यावर जाऊन बसतात. मग सगळ्या बेडकांच्या लक्षात येतं, कि हा राजा अगदीच यूजलेस आहे. मग ते पुन्हा चिडून देवाकडे जातात, आणि त्याने दिलेला राजा यूजलेस असल्याची तक्रार करतात. वर नवीन राजा मिळावा अशी मागणीदेखील करतात.

यावेळी देवाला राग येतो. तो "ठीकाय" म्हणून बेडकांना तळ्यात जायला सांगतो. आणि त्या तळ्यात एक अजगर सोडून देतो. अजगराला बघून सुरूवातीला बेडकांना आनंद होतो. मात्र अजगराने एकेक करून बेडकांना खायला सुरू केल्यावर त्यांना पळता तळं थोडं होतं. मग त्यांच्या लक्षात येतं, कि आपला पहिला राजाच बरा होता. पण आता फार उशीर झालेला असतोय..

(सकाळी कुनाचीतरी सध्याचं सरकार आणि आधीचं सरकार याबाबत केलेली "दगडापेक्षा वीट मऊ" ही कमेंट वाचली, त्यावरून आठवलं..)

#हॅष्टॅग.

Comments

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

Harry Potter Fan Theories