Posts

Harry Potter Fan Theories

Image
हॅरी पॉटर चा फक्त पहिला भागही ज्याने पाहिलाय, तोसुद्धा सांगू शकेल कि डर्स्ली परिवार हॅरीचा किती प्रमाणात तिरस्कार करायचं. पुस्तकात किंवा मूव्हीमध्ये त्याचं कारण असं सांगितलंय कि पेटूनिया तिच्या बहिणीवर म्हणजेच लिली पॉटर वर जळायची. आणि तसंही हॅरी त्यांच्या घरी आश्रितच होता. त्यामुळे त्याचा त्यांना वैताग येऊन त्यातून ते त्याचा तिरस्कार करू लागणं साहजिक होतं. मात्र एका फॅन थिअरी नुसार, फक्त पेटूनिया आणि लिली च्या संबंधांमुळे, किंवा हॅरी त्यांना जड(!) वाटत होता म्हणून ते त्याचा तिरस्कार करत होते असं नाही. तर त्याला अजून एक गोष्ट कारणीभूत होती. ती म्हणजे वोल्डेमोर्ट! वोल्डेमोर्ट कडून चुकून तयार झालेला होर्क्रक्स म्हणजे हॅरी. वोल्डेमोर्टच्या हॅरीच्या शरीरात राहिलेल्या आत्म्याच्या तुकड्यामुळेच डर्स्ली परिवार हॅरी चा जास्त तिरस्कार करायचं. (आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्यात सगळे येडछाप वाटायचे.) ह्या थिअरीला आधार म्हणून डेथली हॅलोज मधल्या लॉकेट कडे पाहता येईल. ते लॉकेट ज्याच्या गळ्यात घातलेलं असायचं त्यावर ते परिणाम करायचं. आणि त्याच्या आसपासच्या लोकांवरही. त्याला कारण

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

Image
हॅरी पॉटर ज्यांनी पाहिलं आहे त्यांना डेथली हॅलोज मधली तीन भावांची गोष्ट नक्कीच माहित आहे. आणि कदाचित खूप आवडतदेखील असेल. मला स्वतःला ती गोष्ट जाम आवडते. त्या गोष्टीबद्दल सुद्धा एक फॅन थिअरी आहे. या थिअरीनुसार, त्या गोष्टीमधला “मृत्यू” किंवा “काळ” हा दुसरा तिसरा कुणी नसून डम्बलडोर होते. आणि ते तीन भाऊ म्हणजे वोल्डेमोर्ट, स्नेप, आणि हॅरी. वोल्डेमोर्ट सगळ्यात मोठा भाऊ. ज्याला सर्वात शक्तिशाली व्हायचं होतं. अगदी मृत्यूपेक्षाही शक्तिशाली. तर सेवरस स्नेप म्हणजे मधला भाऊ, जो त्याच्या प्रेमिकेवर प्रेम करत राहिला, तिच्या मरणानंतरही. कायम! आणि हॅरी म्हणजे तिसरा सगळ्यात लहान भाऊ. ज्याने वेळ आल्यावर मृत्यूला एका जुन्या मित्राला भेटल्याप्रमाणे आलिंगन दिले. वोल्डेमोर्ट बद्दलचं लॉजिक सगळ्यात सोप्पं आहे. त्याला मृत्युच्याही पुढे जायचं होतं हे उघड आहे. त्यामुळे सगळ्यात मोठ्या भावाच्या जागी तो अगदी बरोबर फिट होतो.                                           सेवरस लिलीवर जीवापाड प्रेम करत होता. तिच्या जाण्यानंतरही. हॅरी जर नसता तर मला नाही वाटत स्नेपसुद्धा जिवंत राहिला असता

Harry Potter Theories..

Image
हॅरी पॉटरच्या ज्यांनी फक्त फिल्म्स पहिल्यात, ते लोक कितीतरी गोष्टींना मुकलेत. आणि ज्यांनी बुक्स वाचलीत पण फॅन थियरीज नाहीत वाचल्या ते लोकसुद्धा कितीतरी गोष्टींना मुकलेत.. अशीच एक फॅन थियरी आहे.. की ड्रेको मॅल्फॉयला हर्मायनी ग्रेंजर आवडायची. मनातल्या मनात. असंख्य फॅन्स नी ही थियरी मान्य केली आहे. दुसऱ्या भागात जेव्हा रहस्यमयी तळघरातून कालदृष्टी साप बाहेर आलेला असतो, तेव्हा त्याबद्दलची माहिती हॅरी आणि रॉनला, हर्मायनी च्या हातात असलेल्या एका कागदामुळे कळते. त्यावेळी हर्मायनी निर्जीव झालेली असल्यामुळे तो कागद कुठून आला याबद्दल माहिती मिळत नाही. हॅरी तर्क करतो की तिने तो कागद लायब्ररी मधल्या एखाद्या पुस्तकातून काढला असेल. बुकमध्ये पण असाच उल्लेख आहे. पण एका फॅन थियरी नुसार, तो कागद तिला ड्रेकोने दिलेला असतो. लॉजिकली पाहायला गेलं तर "हर्मायनी" पुस्तकाचं पान फाडेल हे आजिबात पटत नाही. तिचं कॅरॅक्टर ज्याप्रमाणे दाखवलं आहे, त्यानुसार तर ती पोरगी पुस्तकांची पानं दुमडून देखील ठेवत नसेल.. मग फाडायचं लांबच राहिलं.. ह्या थियरी चा बेस म्हणून अजून एक घटना आहे. फिल

The Haunted House.

"तू आधी शांत हो.. इथे बस जरा. मी ग्लास भरतो.." विक्रम सुमेधला म्हणाला. सुमेध त्याच्याकडे आला तेव्हाच अत्यंत घाबरलेला होता, त्याचं पुर्ण शरीर घामाने निथळत होतं. त्याला धड बोलताही येत नव्हतं. विक्रमने आधी त्याला आत घेतलं आणि शांत केलं. तीन महिने झाले असतील सुमेधला इथे येऊन. बदली होऊन इथे आला तेव्हा इथे त्याला कोणी ओळखत नव्हतं. पण तो अजून एकटाच असल्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यात त्याला काहीच अडचण नव्हती. तसा तो दोन महिने हॉटेल मध्ये राहिलासुद्धा. ऑफिस मध्ये त्याची ओळख विक्रमशी झाली. दोघांच्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्यामुळे त्यांच्यात लवकरच मैत्री झाली. विक्रमनेच सुमेधला रहायला घर शोधण्यास मदत केली. त्याच्या ओळखीच्या ब्रोकर थ्रू सुमेधला एक चांगला मोठा बंगला अगदी स्वस्तात भाड्याने मिळाला होता. इतका मोठा बंगला अगदी स्वस्तात मिळाल्यामुळे सुमेध एकदम खुश होता. आतलं फर्निचर वगैरे जुन्या काळातलं असलं तरी एकदम चांगल्या परिस्थितीत होतं. त्या ब्रोकरने किंवा ज्याने कुणी त्या बंगल्याच्या मेन्टेनन्सचं काम केलतं त्याने ते अगदी चोख केलं होतं. एकच गोष्ट सुमेधला खटकली, ती म्हणजे बंगल्याचा र

"Vru the Wondergirl.." & the Mystery of Thor...

एकदा वृ असंच फिरत फिरत लंडनला जाती. तिथं सतत कामासाठी वसवसलेला शेरलाॅक होल्मसपन केस शोधत फिरत असतो. सोबतीला इमा वाॅटसनपन असती. (डाॅ. वाॅटसन सुट्टीवर असल्यामुळं शेरलाॅकनं इमाला एंटर्नशिपसाठी म्हणून बोलवून घेतलेलं असतंय.) मग वृ पन त्यांना केस शोधायला मदत करू लागते. असंच हुडकत हुडकत त्यांना एक केसांची बट सापडते. मग ती बट कोणाची असेल याचा विचार शेरलाॅक करु लागतो. इमा शैरलाॅकला विचारते, "आता ही बट कोणाची आहे हे कसं कळणार..?" "एलिमेंटरी माय डिअर वाॅटसन..", वृ म्हणते. शेरलाॅक म्हणतो, "हा माझा ड्वायलाग हाय.." मग वृ म्हणती, तुझा वाॅटसन वेगळाय.. मग शेरलाॅक गप बसतो. मग सगळे शेरलाॅकच्या घरी जातात. तिथं वृ "रुपांतरण काढा" बनवते. त्यात त्या केसाच्या बटीमधले केस टाकून तो काढा इमाला प्यायला लावते. इमा तो काढा प्यायला का-कू करत असतानाच, अत्यंत येक्सायटेड झालेला शेरलाॅक तो काढा पिऊन टाकतो. दोनच मिंटात शेरलाॅकच्या जागी "थाॅर" दिसू लागतो.. पण नेहमीप्रमाणे लांब केसांचा नाही.. हेअर कट केलेला.. आणि तरीही अत्यंत हँडसम असा. इमा धावत त्याच्याकडे जायला ल

"ञ-मॅन"

Image
"ञ" आणि "त्र".. लहानपनापासूनच जुळे भाऊ. ञ पहिल्यापासूनच बराचसा वाळीत टाकल्यासारखा.. त्र चा मात्र सगळीकडेच लाड होत.. यत्र तत्र सर्वत्र फक्त "त्र"च. ञ ची आठवण मात्र अगदी फारच गरज पडल्यावर होई.(तेही नाईलाजास्तव).. मात्र ञ ला माहित होतं आपल्यात कायतरी स्पेशल आहे. (कारण त्याने लहानपणी राजहंसाच्या आणि बदकांच्या पिल्लांची गोष्ट चोरून वाचलेली असते).. तर.. रिकामटेकडा आणि दुर्लक्षित असल्यामुळे मोठा झाल्यावर चुकीच्या संगतीत राहिल्यामुळे 'ञ' ग्रामरनाझींच्या टोळीकडून वापरला जातो. (ग्रामरनाझी म्हणजे व्याकरणाला 'याक्रन' म्हणनारे). त्र च्या वडिलांच्या मृत्युप'त्रा'त "त्र" असल्यामुळे त्यांची सगळी संपत्ती त्र ला मिळनार हे निश्चित होते. ही संपत्ती आपल्याला मिळावी यासाठी ग्रामरनाझी एक योजना करतात, लोकांच्या नकळत ते त्र आणि ञ ची अदलाबदली करतात.. एकदम असं नाही, आधी ते ठराविक ठिकाणी त्र च्या जागी ञ ला बसवतात.. लोकांना फरक लक्षात येत नाही म्हणल्यावर ते सगळीकडेच ञ चा वापर सुरू करतात. लहानपणापासून जे मिळत नव्हंत ते आता मिळतंय म्हणून, आणि ग्राम