Posts

Showing posts from January, 2017

दात घासण्याचे प्रकार..

लोकं आजकाल गरज म्हनून नाय, तर फाॅर्म्यालिटी म्हनून दात घासत्यात.. दात घासना-यांचेपण प्रकार असत्यात.. सगळ्यात बेसिक म्हंजे, काय काय लोकं दात घासत्यात, तर काय काय "ब्रश" करत्यात. दात घासण्यात राख, मीठ, डाबर लाल, इठोबा, किंवा मग कुटलंबी दंतमंजन चालतं.. (मिसरी त्यात घ्यायची का नाय ह्यावर ईचार चालूये, कारन लोकं टैमपास म्हनूनपन मिसरी घासत्यात). ब्रश करायला पेश्ट सोडून दुसरं काय नाय चालत. दात घासत असल्यावर येकाच ठिकानी हुभं रहावं लागतं. ब्रश करत असल्यावर तोंडात ब्रश ठिवून आक्ख्या घरात हिंडता येतं. (म्हंजे काय काय लोकांनाच हे जमतं. मला तसं नाय जमत, दाताला पेश्ट लागल्या लागल्या ती थुकायची माजी घाई अस्ते. त्यामुळं तोंडात ब्रश ठिवूनपन गप्पा मारता येनारे लोकं मला लई टॅलेंटेड वाटत्यात). दुकानदाराला "कोलगेट" मागून, त्यानं दिलेली "क्लोजप" कोलगेटच हाय असं समजून वापरनारी लोकंबी असत्यात. कोलगेटनं नावच तेवडं कमावलंय.. पन आता काँपिटिशन मध्ये टिकायचं म्हनून कायबी करायलेत.. लोकं मिठानं दात घासत्यात म्हनून ह्यांनी पेश्टीत मिठ टाकलं, राखंनंपन घासत्यात कळल्यावं "चारकोल&q

Breakup..

अरेंज मॅरेजची पहिली स्टेप म्हणजे पोरीचा ब्रेकअप. तिला समजावून, हानून-मारून किंवा ईमोशनल ब्लॅकमेल करून, म्हंजे बाय हूक आॅर क्रूक पोरीला आपल्या बाॅयफ्रेंडला सोडायला लावायचं. तिला कोंडून ठेवनं, मोबाईल काढून घेनं हे सगळं आलंच. येवडं सगळं करूनपन, जेव्हा लोकं तिला बघायला येतील तेव्हा तिनं सगळा नट्टापट्टा करून स्माईली फेस घेउन समोर यावं ही आणि अपेक्षा असतीये. म्हंजे तिची कंडिशन कशी असत्ये.. "दिलपे पत्थर रखके मूँहपे मेकअप कर लिया..(x२), मेरे सैंयाजी से आज मैंने ब्रेकअप कर लिया.." अन् तिचे फ्रेंड्स, ज्यांना घरी काय झालंय म्हाईत नसतंय.. "हमको बिन बताए तूने ये कब कर लिया..?.. (x2) तेरे सैंयाजी से काहे तूने ब्रेकअप कर लिया..?" अतिशयोक्ति वाटेल, फिल्मी वाटेल.. पन खरंच असंच असतंय. जाऊदे.. अजून काही लिहायचा मूड नाईये.. पण आता गाण्यातलं एवढं सगळं लिहिलंय तर रॅप पन ल्हिला पायजे.. "Look baby, मुझे लगता है.. जो भी हुआ है वो व्हेरी व्हेरी wrong है.. जिस लडके को तूने चुना है.. वो बंदा ही तेरे लिए right है.. तू ये ना सोच कि क्या कहेंगे लोग.. तेरे आगे पडी पूरी तेरी ल

समाज चूत्या असतुय.

समाजासाठी कधी काय करायचं नाय.. समाज चूत्या असतुय. तुम्ही आत्ता समाजाच्या भल्यासाठी कायतरी करता, समाज १००-२०० वर्षानी तुमच्या नावानी भांडत बसतुय. तुमच्या बाजूनी बोलनारेबी बावळाट असत्यात, अन् इरोधात बोलनारेबी. बेसिकली सगळीच बावळाट असत्यात. येवडं सगळं कळूनबी समाजासाठी काय करायचंच असंल, तर पैला समाज सोडायचा. समाज येक नसतुय, लै असत्यात. तुम्ही मग भले सगळ्या समाजांच्या लोकांसाठी चांगलं कायतरी करायला जा.. १०० वर्षांनी तुमच्या समाजाची लोकं तुमच्यावर काॅपीराईट मारत्यात. तुमचा पुतळा उभा करत्यात. दुस-या समाजाची मानसं म्हंत्यात ह्यांनी आमच्यासाठी काय नाय केलं. आमच्या समाजातल्या मानसानी आमच्यासाठी केलंय, मग आम्ही त्याचा पुतळा उभा करनार. मग भांडनं लागत्यात. "'आमच्या' मानसानं 'तुमच्या'साठीबी काम केलतं.." असं म्हनून दोन्ही समाजातली लोकं भांडत बसत्यात. म्हनूनच आपलं आपन नीट राहायचं. उगाच समाजासाठी काय करत बसायचं नाय.. न्हायतर मंग हैत आपल्या नावानं भांडनं आपन मेल्यावर.. #हॅष्टॅग.