Posts

Showing posts from December, 2016

Smartphone..

आधी मोबाईल आलं.. घरात एखाद्याकडं मोबैल असायचं, त्यावरनं सगळी फोन करायची.. मग त्या मोबैल मध्ये गेम आलं.. घरातली बारीकी पोरंच त्ये गेम खेळायची.. येकच फोन हाय म्हनून भावंडं बारी बारीनं गेम खेळायची, त्यात लैदा भांडनंबी व्हायची.. मग त्या मोबैलमधनं गानीबी एेकता यू लागली.. येखादा मोठ्यानं गानी लावायचा, अन् सगळी अैकायची. घरातल्या सगळ्यांच्या आवडीची गानी जबरदस्ती बाकीच्यांना ऐकायला लागायची. मग त्या मोबैलमधनं फोटूबी काढता यू लागलं.. लोकं दुसऱ्याचा फोटू काढायची, अन् दुसऱ्याला आपला फोटू काढायला लावायची.. आता स्मार्टफोन हायत.. घरात सगळ्यांकडं येकेक. बारक्या पोरापास्न एक पाय मसनात गेलेली मानसंबी त्यावरच्या गेम खेळत्यात.. आपापल्या स्मार्टफोनवर. आता आजाबात भांडनं नैत होत. गानी अैकायला आता हेडफोन हायत.. सगळी आपल्याला आवडतंय त्येच गानं अैकत्यात.. येकटं येकटं. आपल्यामुळं कुनाला डिश्टर्ब नकू, कि कुनामुळं आपल्याला.. स्मार्टफोननं आपला आपल्याला फोटू काढता येतुय.. कुनाला रिक्वेश्ट करायला नाय लागत.. आमचा फोटू काडा म्हनून.. आता स्मार्टफोनवर आपला आपल्याला पिच्चरबी बगता येतूय.. कुनाचा डिश्टर्ब नाय ना का

ओंडका आणि अजगर...

लहानपनी मम्मी लय गोष्टी सांगायची, त्यातली एक गोष्ट.. एका तळ्यात एक बेडकांचं गाव असतं. तिथले सगळे बेडूक आरामात रहात असतात. त्यांच्यातला एक बेडूक बाहेर जंगल फिरून येतो, आणि सगळ्यांना सांगतो कि जंगलाला "राजा" असतोय. मग ह्या बेडकांना वाटायला लागतं, कि आपल्या तळ्यालापण आपला एक राजा हवा. मग ते सगळे देवाकडं मागणी करतात, कि आम्हाला एक राजा हवाय. देव कामात असतोय, त्यामुळं तो "ठीकाय" म्हणून एक लाकडाचा ओंडका त्या तळ्यात टाकतो, आणि बेडकांना सांगतो कि हाच तुमचा राजा. सगळे बेडूक जाम खुश होतात. असेच काही दिवस जातात, बेडकांना हळूहळू लक्षात यायला लागतं, कि आपला हा राजा काहीच करत नाही, नुसता पाण्यावर तरंगत असतोय. आणि काही दिवसांनी तर बेडकांना त्या ओंडक्याचं काहीच अप्रूप वाटेनासं होतं, काही उत्साही बेडूक तर त्या ओंडक्यावर जाऊन बसतात. मग सगळ्या बेडकांच्या लक्षात येतं, कि हा राजा अगदीच यूजलेस आहे. मग ते पुन्हा चिडून देवाकडे जातात, आणि त्याने दिलेला राजा यूजलेस असल्याची तक्रार करतात. वर नवीन राजा मिळावा अशी मागणीदेखील करतात. यावेळी देवाला राग येतो. तो "ठीकाय" म्हणून बेडकांना

भोळा शंक्या,चतुर ईश्न्या..!

​येक शंक्या असतंय. त्ये मांत्रिक असतंय, अन् पार्टटैम सर्पमित्रबी असतंय. लोकं म्हशी पाळत्येत; ह्यानं रेडा पाळलेला असतंय. त्येच्या आईबापाचा पत्ता नसतुय, बायकूचं नाव पारूबाई असतंय. तसं लई रागीट असतंय; पन कुनी कौतिक केलं की लगीच पागळतंय. शंक्या चश्मा लावतंय. त्याच्या चश्म्याची येक काच गायब असतीय. तरीबी त्ये तसंच येका काचेचा चश्मा घालतंय. म्हनून लोकं कदीकदी त्याला तीन डोळं हायत असं म्हनत असत्यात. येक ईश्न्या असतंय. लई हुशार असतंय. त्ये बहुरूपी असतंय. अन् पार्टटैम जादूगार असतंय. ह्येच्याबी अाईबापाचा पत्ता नसतुय. घरची येक चांगली गुणाची बायकू असतीय. तरीबी भायेर सोळा ठिकानी वळकी काडून ठिवलेल्या असत्यात. ह्ये हुशार असल्यामुळं शांत असतंय. पन बहुरूपी बनून दुस-या येशात गेलं की मोक्कार कालवा करतंय. शंक्या अन् ईश्न्या जबरी दोस्त. म्हंजी काम नसलं की येकमेकाचं त्वांडबी बगनार नैत. पन आडीनडीला येकमेकाची मदत करायला लगीच तयार हुनार. येकमेकाची म्हंजे दरयेळी ईश्न्याच शंक्याची मदत करतू. त्याचं काय है; शंक्याचा सोभाव वर सांगितलायच, तर त्याच्या तशा सोभावामुळं कुनीबी येतंय अन् त्याला फसवून जातंय. शंक्या हय मा