Posts

Showing posts from January, 2018

Harry Potter Fan Theories

Image
हॅरी पॉटर चा फक्त पहिला भागही ज्याने पाहिलाय, तोसुद्धा सांगू शकेल कि डर्स्ली परिवार हॅरीचा किती प्रमाणात तिरस्कार करायचं. पुस्तकात किंवा मूव्हीमध्ये त्याचं कारण असं सांगितलंय कि पेटूनिया तिच्या बहिणीवर म्हणजेच लिली पॉटर वर जळायची. आणि तसंही हॅरी त्यांच्या घरी आश्रितच होता. त्यामुळे त्याचा त्यांना वैताग येऊन त्यातून ते त्याचा तिरस्कार करू लागणं साहजिक होतं. मात्र एका फॅन थिअरी नुसार, फक्त पेटूनिया आणि लिली च्या संबंधांमुळे, किंवा हॅरी त्यांना जड(!) वाटत होता म्हणून ते त्याचा तिरस्कार करत होते असं नाही. तर त्याला अजून एक गोष्ट कारणीभूत होती. ती म्हणजे वोल्डेमोर्ट! वोल्डेमोर्ट कडून चुकून तयार झालेला होर्क्रक्स म्हणजे हॅरी. वोल्डेमोर्टच्या हॅरीच्या शरीरात राहिलेल्या आत्म्याच्या तुकड्यामुळेच डर्स्ली परिवार हॅरी चा जास्त तिरस्कार करायचं. (आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्यात सगळे येडछाप वाटायचे.) ह्या थिअरीला आधार म्हणून डेथली हॅलोज मधल्या लॉकेट कडे पाहता येईल. ते लॉकेट ज्याच्या गळ्यात घातलेलं असायचं त्यावर ते परिणाम करायचं. आणि त्याच्या आसपासच्या लोकांवरही. त्याला कारण

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

Image
हॅरी पॉटर ज्यांनी पाहिलं आहे त्यांना डेथली हॅलोज मधली तीन भावांची गोष्ट नक्कीच माहित आहे. आणि कदाचित खूप आवडतदेखील असेल. मला स्वतःला ती गोष्ट जाम आवडते. त्या गोष्टीबद्दल सुद्धा एक फॅन थिअरी आहे. या थिअरीनुसार, त्या गोष्टीमधला “मृत्यू” किंवा “काळ” हा दुसरा तिसरा कुणी नसून डम्बलडोर होते. आणि ते तीन भाऊ म्हणजे वोल्डेमोर्ट, स्नेप, आणि हॅरी. वोल्डेमोर्ट सगळ्यात मोठा भाऊ. ज्याला सर्वात शक्तिशाली व्हायचं होतं. अगदी मृत्यूपेक्षाही शक्तिशाली. तर सेवरस स्नेप म्हणजे मधला भाऊ, जो त्याच्या प्रेमिकेवर प्रेम करत राहिला, तिच्या मरणानंतरही. कायम! आणि हॅरी म्हणजे तिसरा सगळ्यात लहान भाऊ. ज्याने वेळ आल्यावर मृत्यूला एका जुन्या मित्राला भेटल्याप्रमाणे आलिंगन दिले. वोल्डेमोर्ट बद्दलचं लॉजिक सगळ्यात सोप्पं आहे. त्याला मृत्युच्याही पुढे जायचं होतं हे उघड आहे. त्यामुळे सगळ्यात मोठ्या भावाच्या जागी तो अगदी बरोबर फिट होतो.                                           सेवरस लिलीवर जीवापाड प्रेम करत होता. तिच्या जाण्यानंतरही. हॅरी जर नसता तर मला नाही वाटत स्नेपसुद्धा जिवंत राहिला असता