Posts

Showing posts from July, 2017

The Haunted House.

"तू आधी शांत हो.. इथे बस जरा. मी ग्लास भरतो.." विक्रम सुमेधला म्हणाला. सुमेध त्याच्याकडे आला तेव्हाच अत्यंत घाबरलेला होता, त्याचं पुर्ण शरीर घामाने निथळत होतं. त्याला धड बोलताही येत नव्हतं. विक्रमने आधी त्याला आत घेतलं आणि शांत केलं. तीन महिने झाले असतील सुमेधला इथे येऊन. बदली होऊन इथे आला तेव्हा इथे त्याला कोणी ओळखत नव्हतं. पण तो अजून एकटाच असल्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यात त्याला काहीच अडचण नव्हती. तसा तो दोन महिने हॉटेल मध्ये राहिलासुद्धा. ऑफिस मध्ये त्याची ओळख विक्रमशी झाली. दोघांच्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्यामुळे त्यांच्यात लवकरच मैत्री झाली. विक्रमनेच सुमेधला रहायला घर शोधण्यास मदत केली. त्याच्या ओळखीच्या ब्रोकर थ्रू सुमेधला एक चांगला मोठा बंगला अगदी स्वस्तात भाड्याने मिळाला होता. इतका मोठा बंगला अगदी स्वस्तात मिळाल्यामुळे सुमेध एकदम खुश होता. आतलं फर्निचर वगैरे जुन्या काळातलं असलं तरी एकदम चांगल्या परिस्थितीत होतं. त्या ब्रोकरने किंवा ज्याने कुणी त्या बंगल्याच्या मेन्टेनन्सचं काम केलतं त्याने ते अगदी चोख केलं होतं. एकच गोष्ट सुमेधला खटकली, ती म्हणजे बंगल्याचा र