Posts

Showing posts from April, 2017

"Vru the Wondergirl.." & the Mystery of Thor...

एकदा वृ असंच फिरत फिरत लंडनला जाती. तिथं सतत कामासाठी वसवसलेला शेरलाॅक होल्मसपन केस शोधत फिरत असतो. सोबतीला इमा वाॅटसनपन असती. (डाॅ. वाॅटसन सुट्टीवर असल्यामुळं शेरलाॅकनं इमाला एंटर्नशिपसाठी म्हणून बोलवून घेतलेलं असतंय.) मग वृ पन त्यांना केस शोधायला मदत करू लागते. असंच हुडकत हुडकत त्यांना एक केसांची बट सापडते. मग ती बट कोणाची असेल याचा विचार शेरलाॅक करु लागतो. इमा शैरलाॅकला विचारते, "आता ही बट कोणाची आहे हे कसं कळणार..?" "एलिमेंटरी माय डिअर वाॅटसन..", वृ म्हणते. शेरलाॅक म्हणतो, "हा माझा ड्वायलाग हाय.." मग वृ म्हणती, तुझा वाॅटसन वेगळाय.. मग शेरलाॅक गप बसतो. मग सगळे शेरलाॅकच्या घरी जातात. तिथं वृ "रुपांतरण काढा" बनवते. त्यात त्या केसाच्या बटीमधले केस टाकून तो काढा इमाला प्यायला लावते. इमा तो काढा प्यायला का-कू करत असतानाच, अत्यंत येक्सायटेड झालेला शेरलाॅक तो काढा पिऊन टाकतो. दोनच मिंटात शेरलाॅकच्या जागी "थाॅर" दिसू लागतो.. पण नेहमीप्रमाणे लांब केसांचा नाही.. हेअर कट केलेला.. आणि तरीही अत्यंत हँडसम असा. इमा धावत त्याच्याकडे जायला ल