Posts

Showing posts from February, 2017

"ञ-मॅन"

Image
"ञ" आणि "त्र".. लहानपनापासूनच जुळे भाऊ. ञ पहिल्यापासूनच बराचसा वाळीत टाकल्यासारखा.. त्र चा मात्र सगळीकडेच लाड होत.. यत्र तत्र सर्वत्र फक्त "त्र"च. ञ ची आठवण मात्र अगदी फारच गरज पडल्यावर होई.(तेही नाईलाजास्तव).. मात्र ञ ला माहित होतं आपल्यात कायतरी स्पेशल आहे. (कारण त्याने लहानपणी राजहंसाच्या आणि बदकांच्या पिल्लांची गोष्ट चोरून वाचलेली असते).. तर.. रिकामटेकडा आणि दुर्लक्षित असल्यामुळे मोठा झाल्यावर चुकीच्या संगतीत राहिल्यामुळे 'ञ' ग्रामरनाझींच्या टोळीकडून वापरला जातो. (ग्रामरनाझी म्हणजे व्याकरणाला 'याक्रन' म्हणनारे). त्र च्या वडिलांच्या मृत्युप'त्रा'त "त्र" असल्यामुळे त्यांची सगळी संपत्ती त्र ला मिळनार हे निश्चित होते. ही संपत्ती आपल्याला मिळावी यासाठी ग्रामरनाझी एक योजना करतात, लोकांच्या नकळत ते त्र आणि ञ ची अदलाबदली करतात.. एकदम असं नाही, आधी ते ठराविक ठिकाणी त्र च्या जागी ञ ला बसवतात.. लोकांना फरक लक्षात येत नाही म्हणल्यावर ते सगळीकडेच ञ चा वापर सुरू करतात. लहानपणापासून जे मिळत नव्हंत ते आता मिळतंय म्हणून, आणि ग्राम